प्रविण खांडपासोळे संचालक, दिशा संस्था
                                                                                                       ९७६६६९८४९६

मला सामाजिक क्षेत्रात काम करण्यास या महिन्यात २० वर्षे पूर्ण होईल. या दोन दशकामध्ये माझ्यामध्ये जे बदल झाले त्याचे अवलोकन करताना त्याची कारणमीमांसा करणे गरजेचे वाटते. बरेचदा आपण निवडलेले क्षेत्र आपल्या आवडीनुसार निवडलेल असत. हि संधी फार कमी लोकांच्या वाट्याला येते. आणि ज्या लोकांच्या वात्याल्या हि संधी येते ती त्यांच्या व्यक्तिगत सुरक्षितता आणि भवितव्याची शाश्वती नसल्यामुळे ती लोक चार चौघांसारखी आपल्या क्षेत्राची निवड करतात. आपल्या आवडीनुसार काम न मिळाल्यामुळेच मग त्या कामामध्ये गढून जाण्याचा आणि तन्मयतेचा आनंद सर्वाना लुटता येत नाही. परंतु आपल्या आवडीनुसार काम मिळाल्यावर सुद्धा काही कामाचे स्वरूप बघता त्याचे विपरीत परिणाम आपल्या मनावर होत असतात. मी आणि माझी पत्नी एकाच क्षेत्रात असल्यामुळे त्यातही गुन्हा पीडितांच्या पुनर्वसनासाठी काम करीत असल्यामुळे आमच्या चर्चेचे  विषय  बरेचदा आमच्या कामाशी निगडीत असतात आणि त्यामध्ये येणाऱ्या अडी अडचणी एकमेकांना सांगत असतो. आमच्या कामाचे स्वरूप हे खून, बलात्कार, कौटुंबिक हिंसा ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीला सहाय्य करण्याचे आहे . समस्याग्रस्त व्यक्तींना त्यामधून बाहेर काढताना सततच्या सहवासामुळे त्या तणावाचे संक्रमण आम्हाला सुद्धा होते. पोलीस ,कोर्ट ह्या यंत्रणे सोबत सातत्याने जुळलो असल्याने समस्याग्रस्त व्यक्तींना त्यामधून बाहेर काढत असताना त्यांना आधार देणाऱ्या आमच्यासारखे काम करणारी मंडळी सुद्धा अप्रत्यक्ष तणावाचे बळी पडतात. आणि ह्याचा प्रत्यय आम्ही उभयतांनी बरेचदा घेतला आहे. सुरुवातीच्या काळात तर मी नेहमीच तणावामध्ये  असायचो आपल्याकडे मदत मागायला येणाऱ्या पिडीतांना मार्गदर्शन आणि मदतीसाठी सदासर्वकाळ उपलब्द असलच पाहिजे अन्यथा त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडेल किंवा आणखी अडचणी वाढतील या भावनेण इतक दडपण यायचं कि आपल्या सहनशक्तीचा अगदी कडेलोट होईपर्यंत आणि स्वताची फरफट होईपर्यंत काम करीत राहलो. आणि याचा परिणाम म्हणजे  स्वतःच भावनिक आरोग्य धोक्यात येण्याची संभावना दिसायला लागली. आपल्याला जर बरेच काळापर्यंत कामामध्ये तन्मयता टिकवायची असेल तर या थकव्या मधून बाहेर येण्यासाठी दोन पायऱ्यांवर काम करणे गरजेचे आहे. पहिली पायरी म्हणजे अश्याप्रकारच्या कामामध्ये आपल्याला मानसिक थकवा आला आहे हे मान्य करण आणि लोकांच्या समस्या सोडविताना आपल्यालाही अनेक अडचणी येवू शकतात. आपल्या प्रत्येक सूचना त्यांनी  तंतोतंत पाळायलाच पाहिजे हा अट्टाहास सोडण, आणि त्यांच्या सुद्धा काही अडचणी असू शकतात हे लक्षात घेतलं तर स्वताला हतबल किंवा अपराधी न मानता आपण कुणी सुपर  पॉवर नसून इतरांसारखं हाडा मासाच एक सवेन्दनशील मन असणारा माणूसच आहोत ह्याचा आपण स्वीकार करू. दुसरी पायरी म्हणजे स्वताला समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. हि इतरांना समजून घेण्या अगोदरची पायरी आहे. स्वताला समजून घेण म्हणजे आत्मकेंद्री होण नव्हे, तर स्वताला व इतरांना समजून घेण्याचा समतोल साधण आहे . त्यासाठी स्वतःच मानसिक आरोग्य सुस्थितीत राखण आणि त्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. या समस्येची व्याप्ती फक्त आमच्यापुर्तीच मर्यादित नाही तर या मानसिक थकव्याचे अनुभव आमच्या सोबत काम करणारे आपले सहकारी, पोलीस, न्यायधीश यांना सुद्धा येतात. काम करीत असताना दुखः ,हाल,बळी यांचे तपशील सातत्याने समोर येत असल्याने हा थकवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे अनुभवत असतो. आपण त्या वेदनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसला तरी वारंवार त्या कहाण्या ऐकून त्याची तीव्रता अनुभवत असतो. आणि त्यामुळे आपली सावेन्दना बोथट होते. त्यांच्यासाठी विधायक प्रयत्न करण्या ऐवजी हतबलता, भावनिक उद्रेक नाहीतर सुन्न बधिरता आपण अनुभवत असतो. ह्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काही गोष्टीवर लक्ष केंद्रित केल पाहिजे आणि कृतीशील झाल पाहिजे. आपण पीडितांच्या भोवती सतत संरक्षणाच्या कवच्यामुळे ते अधिकाधिक परावलंबी व दुराग्रही होत जातात. आणि आपल उद्धिष्ट केवळ त्यांना सतत मदत करीत राहण हे नसून त्याचं कायमस्वरूपी पुनर्वसन हे आहे. त्यामुळे आपल्याला दीर्घकालीन उद्धीष्टांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण. आव्हानांसाठी खंबीरपणे सज्ज करण.त्यांना भावनिक स्वावलंबन शिकवायचं असेल तर त्यांना लागलेली सततच्या आधाराची सवय खंडित केली पाहिजे त्यासाठी काही प्रसंगात आधार न देता कठीण प्रसंग स्वतःच हाताळण्यास त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. भावनिक अंतर राखण म्हणजे पिडीताना दूर लोटन नसून  त्यांच्या दीर्घकालीन पुनर्वसनासाठी उचललेल  आवश्यकच पाऊल आहे .

Categories: Blog

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *